ट्यूनिस : ट्युनिशियामध्ये धार्मिक स्थळाजवळ गोळीबार झाला. ट्युनिशियातील जेरबा येथील ज्यूंच्या धार्मिक स्थळाजवळ झालेल्या या गोळीबारात एका सुरक्षा रक्षकासह चार जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले. घटनेनंतर तीर्थस्थान बंद करण्यात आले आहे आणि आत असलेल्यांना तेथेच सुरक्षित ठेवण्यात आले आहे. अधिकारी या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
जेरबा हे ट्युनिशियातील ज्यू समुदायाचे मुख्य धार्मिक केंद्र आहे. येथे वार्षिक ज्यू यात्रेदरम्यान जेरबा येथील मंदिरात जाण्याचा प्रयत्न करत असताना नौदलाच्या सैनिकाने मंगळवारी एका सहकारी आणि दोन नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली. सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केले. मारले गेलेले नागरिक फ्रेंच आणि ट्युनिशियन असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. ठार झालेले नागरिक यात्रेकरू होते की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमींमध्ये सहा सुरक्षा एजंट आणि चार नागरिकांचा समावेश असल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे. आरोपींनी धार्मिक स्थळी पोहोचल्यानंतर तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला.मात्र,सुरक्षा जवानांनीही प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपी प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यापूर्वीच ठार झाल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.