ट्विटरच्या नवीन सीईओचे एलन मस्कसाठी खास ट्विट

सॅन फ्रान्सिस्को -टेस्ला कंपनीचे प्रमुख इलॉन मस्क यांनी लिंडा याकारिनो यांची ट्विटरच्या नवीन सीईओपदी नियुक्ती केली. त्यानंतर त्यांनी एलन मस्कसाठी खास ट्विट केले. यामध्ये त्यांनी मस्कचे विशेष कौतुक केले आहे. याकारिनो यांनी जाहीरपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. शुक्रवारी ट्विटरच्या नवीन सीईओ लिंडा याकारिनो यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यानंतर लिंडा त्यांनी ट्विट करत लिहिले की, ‘धन्यवाद एलन मस्क! मला तुमच्या चांगल्या भविष्यासाठी दीर्घकाळापासून प्रेरणा मिळाली आहे. ट्विटरसाठी काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे. मी या व्यवसायाचा कायापालट करून त्याला नवीन रूप देण्यास मदत करेन.’
लिंडा याकारिनोचे हे ट्विट खास मानले जात आहे. एलन मस्क यांनीही ट्विटद्वारे लिंडा याकारिनो यांची सीईओपदी नियुक्ती झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. लिंडा यांचे स्वागत करताना, मस्कने लिहिले की, ‘आतापासून ती व्यवसाय ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित करेल, तर मी उत्पादन डिझाइन आणि नवीन तंत्रज्ञानावर काम करेन.’ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ४४ अब्ज डॉलरना ट्विटर विकत घेतल्यानंतर एलन मस्क यांनी पराग अगरवाल यांची सीईओपदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर एलन मस्क यांनी ट्विटरचे सीईओपद सांभाळले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top