ठाणे शहरात आज पाणी पुरवठा बंद

ठाणे

ठाणे शहरात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्या ठाण्यात स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. तसेच, ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची साकेत पूल येथे दुरुस्ती करुन व्हॉल्व बदलले जाणार आहेत. या कामांसाठी शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ९ ते शनिवार २७ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतू पार्क, कारागृह परिसर, गांधी नगर, रुस्तमजी, इंदिरा नगर, रुपादेवी, श्रीनगर, समता नगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ८ ते शनिवार २७ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top