मुंबई – गणरायांच्या स्वागतासाठी पारंपारिक वाद्य म्हणून ढोल-लेझीमला पसंती दिली जात आहे. ही परंपरा पुण्याच्या डबेवाल्यांनी जपली आहे. डबेवाल्यांचे पुणेरी ढोल सर्वसाधारण ढोलापेक्षा आकाराने मोठे असतात.त्याचा आवाजही दणदणीत असतो. म्हणून त्यांस खास पुणेरी ढोल लेझीम म्हणतात.ढोल-लेझीम हे वाद्य आहे. परंतु या वाद्याच्या माध्यमातून ढोल पथके ऐतिहासिक संकल्पना साकारतात. नवीन कलाकृती सादर करून समाजप्रबोधनाचे काम आपल्या प्रात्यक्षिकां मधून सादर करतात. यामुळे याला खेळाचा दर्जा प्राप्त झाला आहे.या खेळाच्या सादरीकरणाला ५० ते ६० खेळाडूंची गरज असते.दोन वेगवेगळ्या पथका मधील जुगलबंदी अतिशय रोमहर्षक असल्याने आजही या खेळाला शहरात खूप मागणी आहे.ढोल-लेझीम पथकाकडे खेळ म्हणून पाहिले जात होते.परंतु काळानरूप त्याचे व्यावसायीकरण झाले. आता ढोल-लेझीम वाजवण्यासाठी साधारणपणे दहा हजार रूपये प्रति तास घेतले जातात. बक्षीस स्वरूपात ही कमाई चांगली आहे . आपला व्यवसाय संभाळून या गणेशोत्सवाच्या दहा बारा दिवसात डबेवाल्यांना चांगला रोजगार मिळतो.