नवी दिल्ली : भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांची गुरुवारी जागतिक हवामान संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. डब्ल्यूएमओने याबाबत ट्विट केले आहे. तर आयर्लंडमधील मेट इरिअनचे संचालक इओन मोरान आणि कोट डी ‘आयव्हॉरचे हवामानशास्त्र संचालक दौडा कोनाटे या दोघांचीदेखील डब्ल्यूएमच्या उपाध्यक्षपदी पदोन्नती देण्यात आली
मृत्युंजय महापात्रा, मूळचे ओडिशाचे, भारताचे ‘सायक्लोन मॅन’ म्हणून ओळखले जातात. मृत्युंजय महापात्रा यांना या पदासाठी झालेल्या निवडणुकीत एकूण १४८ मतांपैकी ११३ मते मिळाली. ते २०१९ पासून देशातील सर्वोच्च हवामान कार्यालयाचे प्रमुख आहेत.