मुंबई – भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे महासचिव डी राजा यांनी आज संध्याकाळी सिल्व्हर ओक निवासस्थानावर येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, कर्नाटक निवडणुकीच्या निकालातून जनतेने एक संदेश दिला आहे. कर्नाटकसारखी परिस्थिती इतर राज्यांत निर्माण होऊ शकते. यासाठी मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. भाजपविरोधात शक्ती दाखवावी लागेल. लहान पक्षांची मोर्चेबांधणी करून जनतेला नवा पर्याय देण्याचा विश्वास द्यावा लागेल.
डी राजा म्हणाले की, मी पक्षाच्या कामासाठी मुंबईत आलो. त्यानंतर मी शरद पवार यांना भेटण्यासाठी आलो. शरद पवार यांना काही योजना सांगितल्या. राष्ट्रीय मुद्द्यांवर आम्ही नेहमी चर्चा करत आलो आहे. आता आमचा मुख्य मुद्दा आहे की भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांना एकत्र आणायचे.
डी राजा सिल्व्हर ओकवर! शरद पवारांसोबत चर्चा
