डॅशिंग लेडी जुनो मनीयांचे अपघाती निधन

रायगड

लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसाममधील पोलीस उपनिरीक्षक जुनोमनी राभा यांचे अपघाती निधन झाले. नागाव जिल्ह्यातील कलियाबोर येथील सरूभुगिया गावात जुनोमनी राभा यांची कार एका कंटेनरला धडकली. जुनोमनी या आपल्या खासगी कारमधून प्रवास करत होत्या. सोमवारी मध्यरात्री २:३० वाजेच्या सुमारास त्यांचा अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताची माहिती मिळताच गस्त पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या जुनोमनी यांना ताततडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, याबाबतची माहिती जाखलाबांधा पोलीस ठाण्याच्या प्रभारी पवन कालिता यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशामधून येत असलेला कंटनेर ट्रक पोलिसांनी जप्त केले आहे. तर अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. नागाव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधीक्षक लीना डोले यांनी सकाळी घटनास्थळी जाऊन संपूर्ण माहिती घेतली. दरम्यान, जुनोमनी राभांना लेडी सिंघम आणि दबंग कॉप म्हणूनही ओळखल्या जात होत्या. गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकारी म्हणून त्या खूप प्रसिद्ध होत्या. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आपल्या होणाऱ्या नवऱ्याला त्यांनी अटक केली होती. या प्रकरणानंतर जुनोमनी यांनाही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top