सावंतवाडी – शेतातील मांगराच्या लगत लवू सावंत या शेतकऱ्याची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. सावंतवाडी तालुक्यातील ओवलीये गावात ही खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ओवलीये गावातील वरची वाडी येथे लवू सावंत यांचे शेत आहे. आज सकाळी त्यांचा भाऊ शेतावर गेला असता मांगराच्या लगत त्यांचा भाऊ लवू सावंत रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेले दिसले. त्यानंतर त्याने तात्काळ या घटनेची माहिती गावच्या पोलीस पाटलांना दिली. त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती कळवली. दरम्यान लवू सावंत यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडे पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. लवू सावंत यांची हत्या जमिनीच्या वादातून झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.