तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोचीच्या धावपट्टीवर आदळले

कोच्ची- भारतीय तटरक्षक दलाच्या एएलएच ध्रुव मार्क 3 हेलिकॉप्टरचे आपात्कालीन लँडिंग करताना ते कोची विमानतळाच्या धावपट्टीवर आदळल्याची घटना आज घडली. या अपघातात एका प्रशिक्षणार्थी पायलट जखमी झाला असून त्याच्या हात फ्रॅक्चर झाला आहे. या अपघातानंतर कोची विमानतळाच्या धावपट्टी काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती.

भारतीय तटरक्षक दलाचे हे हलके हेलिकॉप्टर आहे. हेलिकॉप्टर रविवारी केरळच्या कोचीमध्ये चाचणी सुरू होती. उड्डाण झाल्यानंतर हेलिकॉप्टर 25 फुटांपर्यंत उंचावर गेले. त्यावेळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पायलटने हेलिकॉप्टरचे कोची विमानतळाच्या धावपट्टीवर अपात्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी हे हेलिकॉप्टर धावपट्टीवर आदळले. या हेलिकॉप्टरमध्ये 3 कर्मचारी बसले होते. पायलटच्या प्रसंगावधानामुळे सुदेवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र प्रशिक्षणार्थी पायलटचा हाताला मारा बसला. यालिकॉप्टरचे रोटर्स आणि एअरफ्रेमचे नुकसान झाले. अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी चौकशीचे भारतीय तटरक्षक दलाने आदेश दिले आहेत.

Scroll to Top