तपास एकदाचा संपवा! उच्च न्यायालयाचे ताशेरे

मुंबई – एखाद्या प्रकरणाचा तपास किती काळ चालवायचा, त्याला काहीतरी मुदत असावी, असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी सरकारी यंत्रणेच्या वकिलांना चांगलेच खडसावले. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांच्या ७,००० कोटींच्या घोटाळ्यासंदर्भात सुनावणी सध्या उच्च न्यायालयात सुरू आहे. गोयल यांनी महिनाभरासाठी परदेशी जाण्याची परवानगी मागितली आहे.

यासुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि शर्मिला देशमुख यांना एसएफआयओचे वकील हितेश वेणेगावकर यांनी असे सांगितले की, या प्रकरणाचा तपास २०१९ पासून सुरू आहे. तो यावर्षी सप्टेबरपर्यंत संपेल. हा तपास चार वर्षे चालू असल्याचे एकून न्यायाधीशांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी एसएफआयओच्या वकिलांना सांगितले की, २०१९ पासून तपास सुरू आहे. तुम्हाला त्याचा कधी तरी शेवट करायला हवा. तुम्ही कायम तपास चालू ठेवू शकत नाही.
यावर एसएफआयओच्या वकिलांनी हे प्रकरण खूप मोठे असून नरेश गोयल तपासात पूर्ण सहकार्य करत नाहीत, असे सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही न्यायालयाने सक्षम अधिकार्यांची नियुक्ती का करत नाही, असा सवाल त्यांना केला. वेणेगावकर यांनी केवळ नरेश गोयल यांच्या परदेशी जाण्याला विरोध आहे. परंतु त्यांच्या पत्नीच्या परदेशी जाण्याला विरोध नाही, अशी माहीती न्यायालयाला दिली. रेश गोयल यांचे वकील रवि कदम यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत परदेशी प्रवासाला परवानगी असल्याची माहिती दिली. जून महिन्यापर्यंत विदेशी जाण्यास प्रतिबंध केलाय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top