पुणे – पोलिसांना न जुमानता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज संध्याकाळी भीमा-पाटस साखर कारखान्यात दाखल झाले. त्यांनी कारखान्याचे संस्थापक मधुकर शितोळे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर जाहीर सभा घेत राऊत म्हणाले की, ‘कारखान्याचे चेअरमन आमदार राहुल कुल यांनी अनेक छोट्या गोष्टीत भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी 500 कोटींचे मनी लॉड्रिंग केले आहे. याबाबत मी सीबीआयकडे पुरावे दिले. सीबीआय काय कारवाई करेल, हे पाहूया. नाहीतर मी ईडीकडे जाईन. त्यांनीही काहीच केले नाहीतर मी हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जाईन.’ ‘मला तुरुंगात का टाकले होते हे तुम्हाला माहितीय का? मी काही केले नव्हते म्हणून मला तुरुंगात टाकले,’ पुढे राऊत म्हणाले, ‘खरे तर मी माझ्या एका भावाकडून 50 लाख रुपये घरासाठी घेतले होते. ते मी परत केले. त्यामुळे ईडीने मला अडकवले.
…तर राहुल कुलविरोधात कोर्टात जाईन! राऊत यांचा इशारा
