इटानगर
आंतरराष्ट्रीय युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरमध्ये धोक्यात असलेल्या प्रजातींपैकी एक लाल पांडा अरुणाचलमधील तवांग येथे आढळून आला. याबाबत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्विट करत माहिती दिली. यात त्यांनी म्हटले, ‘तवांगमध्ये बुधवारी एक गोंडस लाल पांडा दिसला. भारताच्या ईशान्येकडील राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यात रेड पांडा दिसण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.’
पेमा खांडू यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले, ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरमध्ये धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीत हा लाल पांडाचा समाविष्ट आहे. आपण एकत्रितपणे त्यांचे रक्षण केले पाहिजे. हे जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणीय अखंडता राखण्यासाठी महत्त्वाचे आहेत.’