चेन्नई – तामिळनाडूचे उर्जा मंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम नेते व्ही सेंथिल बालाजी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाकडून शुक्रवारी छापे टाकण्यात आले आहेत. यासोबतच मंत्र्यांशी संबंधितांच्या निवासस्थानावरही छापे टाकण्यात आले. दरम्यान, करूर जिल्ह्यातील सेंथिल बालाजी यांचा भाऊ अशोक याच्या घराची झडती घेण्यासाठी आयकर विभागाचे काही अधिकारी पोहोचले असता द्रमुकचे कार्यकर्ते आणि आयटी अधिकाऱ्यांमध्ये झटापट झाली.
आयकर विभागाकडून तामिळनाडूमध्ये सुमारे ४० ठिकाणी विविध सरकारी कंत्राटदारांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. सध्या चेन्नई, करूर आणि इतर ठिकाणी छापेमारी सुरू आसून, करूर आणि कोईम्बतूरसह अनेक शहरांमध्ये मंत्र्यांशी कथित संबंध असलेल्या लोकांच्या घरांची झडती घेतली जात आहे. दुसरीकडे, आयकर अधिकारी सेंथिल बालाजीचा भाऊ अशोक याच्या घरी शोध घेण्यासाठी पोहोचले तेव्हा डीएमके कार्यकर्ते आणि आयटी अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. सेंथिल बालाजीचे खास आणि जवळचे नातेवाईक आणि काही कंत्राटदार मंत्र्यासोबत कथित भ्रष्टाचारात गुंतले होते, यासाठी प्राप्तिकर विभागाने ऊर्जामंत्र्यांशी संबंधित कार्यकर्त्यांसह नातेवाइकांच्या घरांवर छापे टाकले आहेत.