तामिळ प्रसिद्ध अभिनेते दिल्ली गणेश यांचे निधन

चेन्नई – तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते दिल्ली गणेश यांचे चेन्नईत एका रुग्णालयात काल रात्री निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा महादेवनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली की, “आम्हाला कळवताना अतिशय दुःख होत आहे की, माझे वडील दिल्ली गणेश यांचे रात्री ११ वाजता निधन झाले.”दिल्ली गणेश यांच्यावर अंतिम संस्कार ११ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता होणार आहे. त्यांच्या निधनाने दक्षिणेकडील उद्योगजगतात शोककळा पसरली. चाहत्यांसोबतच इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. दिल्ली गणेशने १९७६ मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते के. बालाचंदर दिग्दर्शित पट्टीना प्रवेशम या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पासी (१९७९)मधील त्यांच्या अभिनयासाठी त्यांनी तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार विशेष पुरस्कार जिंकला आणि १९९४मध्ये कलामामणी पुरस्कारासह अनेक राज्य सन्मान प्राप्त केले.