मुंबई:- ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोमध्ये ‘रोशन सिंह सोढ़ी’च्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. असित कुमार मोदी व्यतिरिक्त प्रोजेक्ट हेड सोहल रमानी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जतिन बजाजच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
ती म्हणली की, १५ वर्ष काम करूनही हाफ डेचे पैसे कापले जायचे, आधी सांगूनही हाफ डे मिळायचा नाही, प्रेग्नन्सी दरम्यान जबरदस्तीने काढून टाकले गेले, लैंगिंक आणि मानसिक शोषण केले गेले. मी आता मालिका सोडली आहे. माझा अखेरचा भाग ६ मार्च रोजी प्रसारित झाला होता. प्रोजेक्ट हेड सोहेल रमानी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जतिन बजाजने मला अपमानित केले. या प्रकरणावर असित मोदी म्हणाले की, ‘ती माझी आणि शो दोघांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याने आम्ही कायदेशीर कारवाई करू. आम्ही तिला काढून टाकल्याने ती हे निराधार आरोप करत आहे.’
या मालिकेचे प्रोडक्शन हाऊस नीला टेलिफिल्मने याप्रकरणी एक निवेदनही जारी केले आहे. ज्यामध्ये असे नमूद करण्यात आले की, ‘तिच्यामध्ये सेटवर आवश्यक शिस्त नाही आणि कामावरदेखील तिचे लक्ष नसायचे. तिच्या वागण्याबाबत आम्ही प्रोडक्शन हेडकडे वारंवार तक्रार दिली आहे. तिच्या सेटवरील शेवटच्या दिवशीही तिने सर्व युनिटसमोर शिवीगाळ केला आणि शूट पूर्ण न करता ती निघून गेली.