बेळगाव
तिरुपतीचे दर्शन घेऊन बेळगावकडे परत येणाऱ्या पाच भाविकांचा अपघातात मृत्यू झाला. क्रुझर वाहनाने लॉरीला मागून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. आज सकाळी आंध्रप्रदेशातील अनमय जिल्ह्यात हा अपघात घडला आहे. ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. हनुमंता आजुर (वय ५२), महानंदा आजुर (वय ४६), शोभा आजुर (वय ३६), अंबिका आजुर (वय १९ चौघेही रा. बडची ता. अथणी जि. बेळगाव), मनमंथ जाधव (वय ५२) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. ११ जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना नजीकच्या रुईया रुग्णालयात दाखल केले आहे.