नंदुरबार- सार्वजनिक बांधकाम विभागाने अलिकडेच ४ कोटी रूपये खर्चून दुरुस्त केलेला तापी नदीवरील सारंगखेडा येथील पूल कोसळला. ३ राज्यांना जोडणारा हा पूल कोसळल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे.
धुळे नंदुरबार जिल्ह्याला जोडणार्या या पुलावरून दररोज हजारो वाहने महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात येजा करत असतात. पुलावर काल एक छोटे भगदाड पडले होते. नंतर हा खड्डा वाढला. त्यामुळे भीती व्यक्त केली जात होती. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने येथील वाहतूक बंद केली होती. आता हा पूल पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लोकांना १०० किमी लांबचा फेरा मारावा लागत आहे.
तीन राज्यांना जोडणारा तापी ‘वरील पूल कोसळला
