तीन राज्यातील पोटनिवडणुकांच्या तारखेत बदल, २० नोव्हेंबरला मतदान

नवी दिल्ली – विविध सणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने केरळ, पंजाब व उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांसाठी मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. या आधी १३ नोव्हेंबरला होणारे हे मतदान आता २० नोव्हेंबरला होणार आहे.पोटनिवडणुकांच्या तारखेत बदल करण्याची विनंती काँग्रेस, भाजपा, रालोदसह अनेक राजकीय पक्षांनी केली होती. या क्षेत्रातील उत्सवांमुळे मतदान कमी होऊ नये म्हणून आयोगाने ही तारीख बदलली आहे. या ठिकाणी आता २० नोव्हेंबरला मतदान होणार असून मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे.