ठाणे – मूळचे सांगलीचे आणि नोकरीनिमित्त मुंबईत आलेले पंडित तुकाराम धायगुडे यांनी आज २७० किलो वजनाची सुपरबाईक १५० वेळा आपल्या पोटावरून जाऊ देण्याचा विश्वविक्रम केला. ठाण्याच्या धर्मवीर मैदानात त्यांनी हा विश्वविक्रम केला.या बाबतीतला आधीचा विश्वविक्रमही त्यांच्याच नावावर होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स` मध्ये करण्यात आली आहे.
देशाचे नाव गिनीज बुकमध्ये नेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंडित धायगुडे यांनी २००९ पासून तयारी सुरू केली. धायगुडे यांनी पोटावरून दुचाकी १२१ वेळा जाऊ देण्याचा विक्रम २०१६ मध्ये केला होता. हा विक्रम मोडत पुन्हा एकदा पोटावरून १५० वेळा दुचाकी जाऊ देण्याचा नवा विश्वविक्रम त्यांनी केला.