तुकाराम महाराजांचा बीज सोहळा गुरुवारी

पिंपरी- जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा येत्या नऊ मार्चला होत आहे. या पार्श्वभूमीवर देहूतील इंद्रायणी नदीच्या तीरावर विविध ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराज गाथा मंदिरात दोन हजार वारकरी गाथा पारायण सोहळ्यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे हरिनामाच्या घोषाने देहूनगरी दुमदुमत आहे. तुकाराम महाराज वैकुंठगमन दिवस म्हणजे संत तुकाराम महाराज बीज सोहळा. या सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक बीज सोहळ्याला उपस्थित राहतात.

Scroll to Top