तुर्की – तुर्कस्तान आणि सीरियामध्ये अजूनही भूकंपाचे धक्के बसत आहेत. अशातच तुर्कीच्या भूकंपग्रस्त भागात मंगळवारी रात्री पावसाने थैमान घातले. त्यामुळे या भागात मोठा जलप्रलय आला. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य सुरु करण्यात आले. यात १४ हून अधिक नागरिकांनी आपले प्राण गमावले.
तुर्की, सीरियातील विनाशकारी भूकंपात ५५,००० हून अधिक नागरिकांचा बळी गेला. यावेळी इथे वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली. या मोठ्या संकटातून नागरिक सावरत नाहीत तोवर अस्मानी संकटाने थैमान घातले. त्यामुळे येथील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले. हा पाऊस बुधवारपर्यंत पडत राहील अशी शक्यता तुर्की हमावान विभागाने वर्तवली होती.