तुर्कीत भूकंपाच्या २१ दिवसानंतर
ढिगाऱ्यातून बाहेर आला जीवंत घोडा!

अंकारा – तुर्कस्तान आणि सिरियामध्ये घडलेल्या भूकंपाच्या घटनांमध्ये हजारो लोकांना प्राण गमवावे लागले. मात्र या विनाशकारी भूकंपानंतर २१ दिवसांनी अदियामन शहरातील इमारतीच्या ढिगाऱ्यात एक घोडा जिवंत सापडला आहे.तानसू येगेन नावाच्या नेटकऱ्याने ट्विटरवर एक क्लिप शेअर केली आहे,ज्यामध्ये काही लोकांची एक एक टीम घोड्याला ढिगाऱ्यातून बाहेर काढताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा घोडा एकदम तंदुरुस्त दिसत आहे. त्यामुळे हा दैवी चमत्कारच असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या महिन्यात सहा फेब्रुवारीला पहाटे ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता.त्यानंतर अनेक दिवस भूकंपाची मालिका सुरू होती.त्यानंतर अजूनही या भूकंपात सुरू असलेल्या बचावकार्यात अनेक दिवसांनी नवजात बालकांसह अनेकांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढताना अनेक चमत्कार घडत आहेत. तुर्कस्तानमध्ये ६ फेब्रुवारीला भूकंप झाला. हा भूकंप इतका तीव्र होता की त्याचे आफ्टरशॉक अजूनही जाणवत आहेत. येथे देशाच्या दक्षिणेकडील भागात सोमवारी ५.६ तीव्रतेचा भूकंप झाला होता. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे आतापर्यंत ४८ हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.

Scroll to Top