सुवा – तुर्की आणि सिरियानंतर पुन्हा एकदा फिजीमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले.आज मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ६.३ रिश्टर स्केल क्षमतेचे भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू फिजीचे राजधानी शहर असलेल्या सुवा या शहराच्या दक्षिणेला ४८५ किमी अंतरावर ५६९ किमी जमिनीखाली होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली.
फिजीमध्ये आतापर्यंत अनेकदा तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गेल्या आठवड्यात गुरुवारी सुद्धा फिजीमध्ये ४.३ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप जाणवला होता. हा देश दक्षिण प्रशांत महासागरात असलेला देश आहे. ३०० हून अधिक बेटांपासून हा देश बनला आहे. आज झालेल्या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.