मुंबई – त्यांनी आमचे निवडणूक चिन्ह चोरले. मातोश्री हे नाव चोरले. आता ठाकरे आडनावदेखील लावतील, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना टोला लगावला आहे.
आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंगळुरू दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री ५० खोकेवाले ४० टक्केवाल्यांचा प्रचार करायला गेले. खरे तर तिथे जाऊन त्यांनी आपल्या मराठी बांधवांचा आवाज ऐकायला हवा होता, पण त्यांनी तसे केले नाही. ते कर्नाटकात जाऊन भाजपचा प्रचार करीत आहेत. त्यांनी विरोधकांच्या वज्रमूठ सभेचा धसका घेतला आहे. आम्ही उन्हामुळे वज्रमूठ सभा घेत नाही आहोत. उन्हामुळे दुर्घटना घडू नये हा त्या मागचा उद्देश असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.