मुंबई – मुंबई महापालिकेच्या वांद्रे येथील के.बी.भाभा रुग्णालयात एका ३२ वर्षीय थायरॉईडग्रस्त महिलेवर ‘मायक्रोवेव्ह एब्लेशन’ हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पालिका रुग्णालयातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे.या महिलेच्या घशाला सूज आल्याने तिला खाण्यापिण्यासाठी त्रास होत होता.
या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या २ तासांत या महिलेला खाण्यास,बोलण्यास व चालण्यास डॉक्टरांनी परवानगी दिली आहे.या शस्त्रक्रियेचा कोणताही व्रण शरीरावर नव्हता.त्याचप्रमाणे काही तासांत या महिलेला वैद्यकीय तपासणी करून रुग्णालयातून घरी पाठवले. या शस्त्रक्रियेत अंतर्गत सुईद्वारे थायरॉईडमधील बाधित पेशी नष्ट करण्यात आल्या होत्या,अशी माहिती उपनगरीय रुग्णालयांच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ.विद्या ठाकूर आणि डॉ. आम्रपाली यांनी दिली.