दक्षिण आफ्रिकेमध्ये पुन्हा रामफोंसा अध्यक्ष

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष म्हणून सिरील रामफोंसा यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली.मात्र यावेळी ते आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस या आपल्या एकाच पक्षाच्या सरकारने नेतृत्व करणार नसून आघाडी सरकारचे नेतृत्व करणार आहेत.

आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस पक्षाला निवडणुकांमध्ये बहुमत मिळू शकले नव्हते. दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या ३० वर्षात पहिल्यांदाच आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस हा पक्ष निवडणुकीत पराभूत झाला होता.मात्र एएनसी आणि डेमोक्रॅटिक अलायन्स या दोन पक्षांनी आपापसातील वैर बाजूला ठेवून आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.या निवडणुकीमध्ये एएनसी पक्षाला ४० टक्के तर डेमोक्रॅटिक अलायन्स पक्षाला २२ टक्के मते मिळाली आहेत.या आघाडी सरकारचे नेतृत्व रामफोंसा यांच्याकडेच असणार आहे. राजधानी जोहान्सबर्गमध्ये सरन्यायाधीश रेमंड झोंदो यांनी त्यांना अध्यक्षपदाची शपथ दिली.देशात राष्ट्रीय ऐक्याचे सरकार स्थापन होत आहे.त्यामुळे देशवासियांना एकमेकांविरोधात उभे करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये,असे आवाहन रामफोंसा यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top