मुरगाव- गोवा राज्यातील अनेक भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून गोवेकर हैराण झाले आहेत. मुरगाव तालुक्यातील अनेक भागात मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी पाणीटंचाई निर्माण झाली. दक्षिण गोव्यात सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाचा फटका साळावली जलशुद्धीकरणाच्या वीजपुरवठ्यावर पडल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला.
६ हजार ते ८ हजार लिटर पाणी वाहून नेणाऱ्या टँकरसाठी १,००० ते १,६०० रुपये मोजून जनतेला खाजगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबत रहिवाशांनी साबांखा विभागाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. पीडब्ल्यूडीचे सहाय्यक अभियंता नरेश पैंगीणकर म्हणाले की, एक-दोन दिवसांत पाणीपुरवठ्याची समस्या सोडवली जाईल.
दक्षिण गोव्यात सलग ३ दिवस पाणी नाही!
