पुणे – शेतकर्यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारतासाठी आणि वैशाख वणव्यापासून सर्वांचे रक्षण व्हावे, याकरिता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात 11 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य शुक्रवारी दाखविण्यात आला. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी मंदिरात पूजा, गणेशयाग व अभिषेक झाला. गाभार्यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती. श्री गणेशांचे विविध लीला स्वरुपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते. वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे.
दगडूशेठ हलवाई गणपतीला अकरा हजार शहाळ्यांचा महानैवेद्य
