दहावीनंतर आयुर्वेदिक डॉक्टर होता येणार

वर्धा- दहावीनंतर आता आयुर्वेदिक डॉक्टर होऊन बीएएमएसची पदवी मिळणार आहे. हा अभ्यासक्रम साडेसात वर्षांचा असेल. याबाबत भारतीय वैद्यक पद्धत राष्ट्रीय आयोगाने गतवर्षी नियम तयार केले आहेत. त्यावर आलेल्या आक्षेप, सूचनांचा विचार करून अंतिम स्वरूपात अभ्यासक्रम निश्चित झाला असून तशी अधिसूचना आता प्रसिद्ध झालेली आहे.पहिली दोन वर्ष प्री आयुर्वेद अभ्यासक्रम असेल. साडेचार वर्ष बीएएमएस पदवी अभ्यासक्रम राहणार आहे. परीक्षा देण्यासाठी ७५ टक्के हजेरी अनिवार्य असून प्रत्येक विषयाच्या तासिकेतदेखील ७५ टक्के हजेरीची सक्ती राहणार आहे. वर्षाच्या अखेरीस वार्षिक परीक्षा होणार आहे. किमान ५० टक्के गुण मिळण्याची सक्ती आहे. मात्र या आयुर्वेद पूर्व अभ्यासक्रमासाठी नीट पीएपी द्यावी लागणार आहे. त्यासाठी ठराविक गुणांची अट राहणार आहे.