मुंबई
दादर पूर्वेकडील हिंदू कॉलनीतील एका १५ मजली निवासी इमारतीच्या १३व्या मजल्यावर आज सकाळी आग लागली. आगीमुळे सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे एका व्यक्तीचा श्वास गुदमरून तो बेशुद्ध झाला. त्याला तातडीने सायन रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सचिन पाटकर असे मृत व्यक्तीचे नाव असून ते ६० वर्षांचे होते.या घटनेतील जखमींना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत बचावकार्य केले. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.