नवी दिल्ली – दिल्लीच्या महापौरपदी पुन्हा एकदा ‘आप’च्या डॉ. शेली ओबेरॉय विराजमान झाल्या आहेत. उपमहापौर म्हणून ‘आप’चे आले मोहम्मद इक्बाल यांची निवड झाली. मतदान प्रक्रियेच्या काही मिनिटांआधीच भाजपच्या उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे ‘आप’चे उमेदवार यावेळी बिनविरोध निवडून आले. स्थायी समिती गठीत करण्यास ‘आप’ने मनाई केली. त्यामुळे लोकांचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याचे कारण देत भाजपाने निवडणुकीतून माघार घेतली. दिल्लीत 22 फेब्रुवारी रोजी महापौरपदाच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी डॉ.शेली ओबेरॉय मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या होत्या. मात्र, त्यांचा कार्यकाळ 31 मार्च रोजीच संपुष्टात आला. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच एप्रिल महिन्यात नवा महापौर निवडला जातो. दिल्लीत पुन्हा महापौरपदाच्या निवडणुका लागल्या. या निवडणुकीत भाजपा आणि आपने दोघांनीही उमेदवार जाहीर केले. नंतर भाजपाने माघार घेतली.
दिल्लीच्या महापौरपदी पुन्हा ‘आप’च्या शेली ओबेरॉय
