नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत जवलपुरी भागातील कुंवर सिंग नगर, नांगलोई रोड येथे एलपीजी सिलिंडर स्फोटामुळे चार मजली इमारत कोसळली. या घटनेत ८ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
या घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाला रविवारी रात्री साडेअकरा वाजता घटनेची माहिती मिळाली. या इमारतीत अनेक कार्यालयेही होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.