दिल्लीत विरोधी पक्षनेत्यांची शरद पवारांसोबत आज बैठक

नवं दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी गुरुवारी विरोधी पक्ष नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. ६ जनपथ, या पवारांच्या निवासस्थानी ही बैठक संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. काँग्रेसलासुद्धा या बैठकीत आमंत्रित केले आहे. यामुळे कोण कोण विरोधी पक्षनेते पवारांच्या बैठकीला हजर राहणार, याची उत्सुकता तर आहेच. पण २०२४ च्या निवडणुकांसाठीची ही तयारी सुरू असल्याच्या चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. दरम्यान, ग्रामीण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर चर्चा करण्यासाठी पवारांनी ही बैठक बोलवली असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, तृणमूल आणि समाजवादी पक्षाने हे स्पष्ट केले होते की आपण भाजप आणि काँग्रेसला समान अंतरावर ठेवणार आहोत आणि त्याच पार्श्वभूमीवर विरोधकांच्या एकीमध्ये फूट पडली असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर ही विरोधी पक्षनेत्यांची बैठक महत्वाची आहे.

Scroll to Top