दिल्लीला पावसाने झोडपले! २४ तासात १२ मिमी पाऊस

दिल्ली- दिल्लीमध्ये रात्रभर जोरदार पाऊस पडला. दिल्लीचे मुख्य हवामान केंद्र असलेल्या सफदरजंग वेधशाळेत या पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत २४ तासांच्या कालावधीत १२ मिमी पाऊस पडला. मागील ३ वर्षांतील पावसाच्या तुलनेत हा पाऊस सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येते. या पावसामुळे दिल्लीच्या तापमानातही घट झाली.

शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने सांगितले की, शहरातील किमान तापमान १५.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा दोन अंश कमी आहे. यावेळी सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण ८५ टक्के नोंदवले गेले. आज आकाश अंशतः ढगाळ आणि कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सकाळी ९ वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक १०२ होता, जो मध्यम पातळीवर आहे.

Scroll to Top