नवी दिल्ली : दिल्ली-दोहा इंडिगो विमानात एक प्रवासी आजारी पडल्यामुळे इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे पाकिस्तानतील कराची विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मात्र वैद्यकीय पथककाकडून विमानतळावरच त्यांना मृत घोषित करण्यात आले. हा प्रवासी नायजेरियन नागरिक आहे.
दिल्लीहून दुबईला जात असताना उड्डाणाच्या मध्यभागी असतानाच हा प्रवासी आजारी पडला. त्यानंतर इंडिगो विमानाच्या वैमानिकाने वैद्यकीय आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली होती, जी कराची विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रकाने मंजूर केली. त्यांनतर वैद्यकीय आपत्कालीन सेवेसाठी दिल्लीहून दोहाला जाणारे इंडिगोचे ६ई-१७३६ विमान वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे कराचीला वळवण्यात आले होते. या प्रवाशाला विमानतळावर पोहोचवण्यात आले तेव्हाच विमानतळाच्या वैद्यकीय पथकाकडून त्यांना मृत घोषित करण्यात आले. अब्दुल असे या प्रवाशाचे नाव असून ते नायजेरियन नागरिक आहेत. मात्र, विमान उतरण्यापूर्वीच ६० वर्षीय अब्दुल यांचा मृत्यू झाला. सीएए आणि एनएच च्या डॉक्टरांनी प्रवाशाचे मृत्यू प्रमाणपत्र जारी केले आहे. दरम्यान, इंडिगो एअरलाइन्सने या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.