दिवसा हल्ले करणार नाही इस्रायली लष्कराची घोषणा

जेरुसलेम – गाझाच्या दक्षिणेकडील भागामध्ये मदतसाहित्य पोहोचवता यावे आणि त्यांना अडथळा होऊ नये म्हणून आता दिवसा कोणतेही हल्ले करायचे नाहीत,असे इस्रायलच्या लष्कराने जाहीर केले आहे.

आता दररोज सकाळी ८ ते रात्री ७ यावेळेत युद्धबंदी असणार आहे.इस्रायलने केलेली ही घोषणा इजिप्तची सीमा आणि त्याला लागून असलेल्या राफा शहरातील महामार्गाच्या १२ किलोमीटर अंतरापर्यंत लागू राहणार आहे.पुढील सूचना मिळेपर्यंत ही युद्ध स्थगिती लागू असेल,असे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे.मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाने या परिसरामध्ये पूर्ण युद्धबंदीची मागणी केली होती.ती इस्रायलकडून अद्याप मान्य झालेली नाही. इस्रायलचा मित्र देश असलेल्या अमेरिकेनेही या भागामध्ये पूर्ण युद्धबंदीची मागणी केली आहे. इस्रायलने जर ठरवल्याप्रमाणे या भागात युद्ध स्थगिती केली तर पॅलेस्टिनींच्या किमान गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतील. या युद्ध स्थगितीच्या काळात इस्रायलचे नियंत्रण असलेल्या केरेन शालोम क्रॉसिंगपर्यंत मदतीचे ट्रक जाऊ दिले जाणार आहेत. या भागात उत्तर -पश्‍चिम गाझाला जोडणाऱ्या महामार्गापर्यंत जाण्यासाठीचा मुख्य आणि सुरक्षित मार्ग आहे, असे इस्रायली सैन्याने म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top