मुंबई :
दहीहंडी पथकात उत्साहाने सहभागी झालेला विरारचा रहिवासी सूरज कदम याच्यावर सध्या मुंबईच्या के. ई. एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऑफिस बॉय म्हणून काम करणारा हा २५ वर्षीय गोविंदा गुरुवारी गोविंदाच्या दुसऱ्या थरावरून खाली पडला आणि त्याला जबर दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या शरीराचा छातीपासूनचा खालचा भाग पूर्णतः लुळा पडला आहे.
आई-वडिलांचे छत्र कोरोनाकाळत हरपलेल्या सूरजला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. सूरज फोर्टमधील एका कार्यालयात काम करून कुटुंबाची देखभाल करतो. मात्र, गुरुवारी घडलेल्या घटनेने सर्व कुटुंबीय हादरून गेले आहे. सूरज दुसऱ्या थरावरून कोसळल्यावर त्याच्या मानेवर अनेक गोविंदा कोसळले. त्यात त्याच्या मणक्याला जबर मार बसला. त्यामुळे त्याच्या शरीराचा छातीपासूनचा खालचा भाग पूर्णतः लुळा पडला आहे. वैद्यकीय परिभाषेत या अवस्थेला सर्व्हायकल व्हर्टिब्रा फ्रॅक्चर असे संबोधले जाते. दरम्यान, अन्य एका घटनेत सोहम पेडणेकर हा ३० वर्षीय गोविंदा जखमी झाला. सोहमच्या कमरेजवळच्या मणक्याला किरकोळ दुखापत झाली. त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.