कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळची निवडणूक २०२१ मध्ये झाली होती. या निवडणुकीत महाडिकांच्या सत्ता केंद्राला सुरू लावत आमदार हसन मुश्रीफ, सतीश पाटील खासदार संजय मंडलिक यांनी २१ पैकी १७ जागा जिंकत गोकुळमध्ये सत्तांतर घडवून आणले होते. यानंतर १४ मे २०२१ रोजी गोकुळच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली होती. आता अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांना संधी दिली जाणार आहे. दूध उत्पादक संघ गोकुळमध्ये अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
गोकुळमधील कारभारी मंडळींनी विश्वास पाटील यांना दोन वर्षांचा कालावधी दिला होता. १० मे रोजी विश्वास पाटील यांच्या अध्यक्षपदाची मुदत संपली आहे. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांना संधी दिली जाणार आहे.या संदर्भात लवकर बैठक होणार आहे. आमदार सतेज पाटील कर्नाटकच्या निवडणुकीत व्यस्त होते. कर्नाटकच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे सतेज पाटील आणि मुश्रीफ दोन दिवसांत कोल्हापुरात येतील. त्यानंतर ते यासंदर्भात बैठक बोलावून निर्णय घेण्याची शक्यता आहे.