देवगड – सिंधुदुर्गातील महत्वाचे बंदर समजले जाणारे देवगड बंदर सध्या असुविधांचे आगर बनले आहे. या बंदरात गाळ साचल्याने बोटींना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जेटी प्रकल्प अनेक वर्षे रेंगाळला आहे.मासे उतरवण्याच्या केंद्रावर मूलभूत सुविधाच नसल्याच्या तक्रारी मच्छिमार करत आहेत.
या बंदरावर माशांच्या लिलावासाठी,मासे सफाईसाठी ते वेचून झाल्यावर उरलेला मत्स्य कचरा टाकण्याची सोय नाही.डिझेल दराप्रमाणे मासळी मिळत नसल्याने खर्चही वसूल होत नाही. बंदरात गाळ साचल्याने बोटी रुतून अपघात घडण्याची शक्यता असल्याचे मच्छिमार सांगत आहेत. मासे उतरण्याची केंद्रे अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची आहेत.आनंदवाडी जेटीचे काम अनेक वर्षे प्रलंबित आहे.त्यामुळे मच्छिमारांची मोठी अडचण झाली आहे. महिलांच्या मासेविक्री करण्याच्या जागाही कायम अस्वच्छ असतात.त्यामुळे आता सरकारने या बंदराच्या निदान मूलभूत समस्या सोडविण्यासाठी तरी हालचाल करावी अशी मागणी स्थानिक मच्छिमार बांधव करत आहेत.
देवगड बंदर असुविधांचे आगर! गाळ साचल्याने बोटींना धोका
