देशातील सर्वात महाग घर मुंबईत
२५२ कोटींना झाली विक्री

मुंबई

मुंबईतील एक आलिशान ट्रिपलेक्स फ्लॅट तब्बल २५२ कोटी रुपयांना विकला गेला. हा फ्लॅट १८ हजार चौरस फूट एवढा मोठा आहे. याचा व्यवहार उद्योगपती नीरज बजाज आणि मायक्रोटेक डेव्हलपर्स (लोढा समूह) यांच्यात झाला. हा फ्लॅट मुंबईतील वाळकेश्वर या भागात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये आहे.

बजाज समूहाच्या संचालकांनी लोढा मलबार इमारतीमधील वरचे तीन मजले बुक केले आहेत. ही इमारत राजभवन जवळ आहे. या फ्लॅमध्ये प्रतिचौरस फुटाची किंमत १.४ लाख रुपये आहे. या ३१ मजली इमारतीचे बांधकाम सध्या सुरू असून ते २०२६ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. यातील २९, ३० आणि ३१ वा मजला बजाय यांनी खरेदी केला आहे. आतापर्यंत भारतात झालेला हा सर्वात महागडा व्यवहार मानला जातो. फेब्रुवारीमध्ये मुंबईतील वरळी येथे ३० हजार चौरस फुटाचे पेंट हाऊस उद्योगपती बी.के. गोयंका यांनी खरेदी केले होते. गोयंका हे वेलस्पन ग्रुपचे अध्यक्ष आहेत. त्यांनी हे पेंट हाऊस २४० कोटी रुपयांना खरेदी केले होते. तेव्हा हा देशातील सर्वात मोठा व्यवहार ठरला होता. मात्र, महिनाभरातच त्यापेक्षा मोठा व्यवहार बजाज आणि लोढा समूहाने केला.

Scroll to Top