देशात जनगणनेसाठी आंदोलनाची गरज

मुंबई : जो पर्यंत ओबीसींची आकडेवारी कळणार नाही तो पर्यंत ओबीसी आपल्या हक्कापासून वंचित राहतील. यासाठी जनगणना झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी करत यासाठी आंदोलनाची गरज असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री व समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारीणीची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार देशाच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे अशी टिका केली. समता परिषदेचा अजेंडा हा गरिबांचा, मागासवर्गीयांचा आहे. त्यामुळे समता परिषद ही मागासवर्गीय, वंचित, दलीत घटकासाठी नेहमी लढत राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच समता परिषदेची व्याप्ती वाढवली पाहिजे. प्रत्येक घरात हे फुले शाहू आंबेडकरांचे विचार गेलेच पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने एकजुटीने काम करायला हवे. तरच ओबीसी घटकाला फायदा होईल, असे प्रखर मत भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top