देशात ५०० हून अधिक
कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली :

दीर्घ काळानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेल्या चोवीस तासात रूग्ण संख्येत ५२४ ने वाढ झाली. ११३ दिवसानंतर रूग्ण संख्येचा आकडा पाचशेच्या वर गेला आहे. दरम्यान सक्रिय रुग्णांची संख्यादेखील वाढून ३ हजार ६१८ वर पोहोचली आहे. मागील चोवीस तासात कोविडने एका व्यक्तीचा बळी घेतला आहे. यानंतर कोरोनाने बळी घेतलेल्यांची संख्या वाढून ५ लाख ३० हजार ७८१ वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोना झालेल्यांचा आकडा ४ कोटी ४६ लाख ९० हजार ४९२ वर पोहोचला आहे. दुसरीकडे बरे झालेल्यांचा आकडा वाढून ४ कोटी ४१ लाख ५६ हजार ९३ इतका झाला आहे. मृत्यू दर १.१९ टक्क्यांच्या आसपास तर रिकव्हरी दर ९८.८० टक्क्यांच्या आसपास स्थिर आहे. दरम्यान कोरोना नियंत्रणासाठी आतापर्यंत २२०.६४ कोटी डोसेस देण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

Scroll to Top