देशाला कोरोनाचा धोका! मोदींच्या उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली :- देशातील कोरोनाची वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. आज दुपारी ४.३० वाजता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे बैठक पार पडली. बैठकीदरम्यान मोदींनी देशातील कोरोनाच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. याशिवाय आरोग्य यंत्रणांच्या तयारीबाबत माहिती घेत अधिकार्‍यांशी चर्चा केली. भारतात कोरोनामुळे दगावलेल्या कोरोना रूग्णांची संख्या ५,३०,८१३ इतकी आहे. यामध्ये ५ नव्या मृतांची भर पडली आहे. छत्तीसगड, दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्र, केरळ मध्ये प्रत्येकी एक बळी नोंदवण्यात आला आहे. भारतात कोविड १९चा दररोज पॉझिटिव्हिटी रेट १.०९% झाला आहे. तर, आठड्याभरातील पॉझिटीव्हिटी रेट ०.९८% झाला आहे. आज आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ११३४ नवीन रुग्णांची नोंद आहे. तर, सक्रिय रुग्णांची संख्या ७०२६ इतकी नोंद आहे.

Scroll to Top