नवी दिल्ली:- देशाला १७ वी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस मिळणार आहे.ही ‘वंदे भारत’ एक्सप्रेस हावडा ते पुरी अशी धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहे. बंगालमधून धावणारी दुसरी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस आहे, तर ओडिशामधील ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे. ही वंदे भारत गाडी हावडा जंक्शनपासून, भुवनेश्वर, जाजपुर क्योंझर रोड, कटक, भद्रक, बालेश्वर, हल्दियामधून पुरीपर्यंत जाणार आहे.रेल्वे मार्गावर ही वंदे भारत एक्सप्रेस १३० किमी ताशी वेगाने धावणार आहे. या एक्सप्रेसचे तिकीट दर १५९० रुपये ते २८१५ रुपयांपर्यंत आहे. वंदे भारत एक्सप्रेस हावडा ते पुरी दरम्यानचे ५२० किलोमीटरचे अंतर ६ तासांत पूर्ण करणार आहे. ट्रायल रन दरम्यान, ही वंदे भारत एक्सप्रेस पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशनवरून सकाळी ६.१० वाजता निघाली आणि सहा तासांत पुरीला पोहोचली. या ट्रेनची ट्रायल रन २८ आणि ३० एप्रिलला झाली होती.
देशाला मिळणार १७ वी वंदे भारत एक्सप्रेस
