’द केरला स्टोरी’ आता विदेशात 37 देशांमध्ये प्रदर्शित होणार

नवी दिल्ली – दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची धूम सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. एकीकडे राजकारणाशी संबंधित लोक या चित्रपटाला विरोध करत आहेत. तर दुसरीकडे चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दीही होत आहे. त्यामुळे भारतात झालेल्या गदारोळानंतर हा चित्रपट आता जगभरात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये ‘द केरला स्टोरी’ करमुक्त झाला. पश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये या चित्रपटावर बंदी नाही. परंतु थिएटर मालकांनी चित्रपटगृहांमधून हा चित्रपट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रचंड विरोधादरम्यान, हा चित्रपट 12 मे रोजी यूकेसह 37 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अदा शर्मा हिने ट्विट रिट्विट करून हा चित्रपट यूके आणि आयर्लंडमध्ये कोणत्या भाषेत प्रदर्शित होणार याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट यूकेमध्ये हिंदी आणि तमिळमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top