नवी दिल्ली- ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशनने त्याला प्रमाणपत्र देण्यास नकार दिलेला द केरला स्टोरी हा चित्रपट लवकरच ब्रिटनमध्ये प्रदर्शित होणार आहे. ही माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी दिली आहे.
हा चित्रपट १२ मे रोजी ब्रिटनमध्ये प्रदर्शित होणार होता. पण ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशनने त्याला प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने या चित्रपटाचे पूर्वनियोजित शो रद्द करावे लागले होते. मात्र आता हा चित्रपट ब्रिटनमध्ये प्रदरिशित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी ट्विट करत सांगितले आहे की, ‘द केरला स्टोरी’ चित्रपट ब्रिटेनमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘अभिनंदन ग्रेट ब्रिटन. तू जिंकलास. दहशतवाद हरला आहे. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. आता ब्रिटिश लोक दहशतवादाविरुद्धची सर्वात मोठी क्रांती पाहतील.
द केरला स्टोरी चित्रपट ब्रिटनमध्ये प्रदर्शित होणार
