द. कोरियामध्ये महिलांचे
कामाचे तास वाढणार?

सोल – दक्षिण कोरियाच्या कामगारमंत्री जुंग-सिक यांनी कामगार सुधारणा प्रस्ताव आणला असून या प्रस्तावानुसार महिलांना आठवड्यात 52 ऐवजी 69 तास काम करावे लागणार आहे. या प्रस्तावाला कोरियन महिला संघांनी कामगारमंत्र्यांच्या कडाडून विरोध केला असून या प्रस्तावामुळे केवळ महिलांचे नुकसानच होणार असल्याचे महिला संघांचे म्हणणे आहे.
कामगार सुधारणा प्रस्ताव दक्षिण कोरियातील घटत्या प्रजनन दरात मदत करेल का, या प्रश्नावर ली म्हणाल्या की, ‘आम्ही गरोदर महिला आणि मुलांचे पालनपोषण करणाऱ्या कुटुंबांना जास्त सूट देण्याच्या निर्णयावर विचार करत आहोत. महिलांबाबत तयार केलेले हे विधेयक नॅशनल असेंब्लीत मंजूर होणे बाकी आहे. जानेवारी महिन्यात राष्ट्रपती यून सूक-योल यांनी कामाचे तास वाढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. कामाचे तास वाढल्यावर ओव्हरटाइमचे तासाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होतील.या प्रस्तावामुळे कामकाज करणाऱ्या मातांना जास्त पर्याय मिळतील आणि मुलांच्या पालनपोषणात मदत मिळेल.` मात्र, या प्रस्तावाला कोरियन महिला संघांनी आधीपासून जोरदार विरोध केला आहे.

Scroll to Top