बंगळुरू- कर्नाटकातील कोल्लूरजवळील अरसीनागुंडी धबधब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण धबधब्यात रील बनवत होता. रील बनवताना त्याचा पाय घसरला आणि तो वेगाने वाहणाऱ्या पाण्यात वाहून गेला. या तरुणाचा अद्याप शोध लागलेला नाही. बचाव पथक तरुणाच्या शोध घेत आहे. याप्रकरणी कोल्लूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धबधब्यावर रील बनवताना तरुणाचा पाय घसरला
