धावत्या ट्रेनमध्ये कन्या जन्मली पित्याला हवा मोफत प्रवास

मुंबई

कोल्हापुर हून मुंबईला येत असलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधून प्रवास करताना मिरा रोडची फातीमा खातुन ही महिलेची प्रसुती झाली. त्यांनी एका मुलीला जन्म दिला आधी तीन मुले असलेल्या या दाम्पत्याने या मुलीच्या जन्माबद्दल आनंद व्यक्त केला असून या मुलीचे नाव महालक्ष्मी असे ठेवणार असल्याचे म्हटले आहे. मात्र चालत्या रेल्वेत कन्या जन्माला आल्याने आजीवन मोफत प्रवास मिळावा, अशी अजब अपेक्षा मुलीचे पिता हुसेन तैय्यब यांनी व्यक्त केली आहे. मी प्रमाणपत्राची वा कागदपत्रांची वाट पाहात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, रेल्वेत जन्म झाला तर त्याला आजीवन रेल्वे प्रवास मोफत देण्याची रेल्वेची कोणतीही योजना नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top