पटणा- बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी पाटणा येथे हनुमान कथेचे आयोजन केले. या कथेला इतका जोरदार प्रतिसाद मिळाला की, मध्यरात्रीही त्यांनी दरबार भरवला.
बुधवारी बागेश्वर बाबांच्या हनुमान कथेचा शेवटचा दिवस होता. बाबांना भेटण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगळवारी रात्रीही हाॅटेल जवळ बॅरिकेडिंग करण्यात आले. मात्र भाविकांची गर्दी वाढत गेली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दोन भाविकांना ताब्यात घ्यावे लागले.